व्याज दर - १६%
रक्कम - १००० ते १०००००
तुमच्या गरजांसाठी तत्पर वित्तीय सहायता
श्रेयस नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत आपल्या सभासदांच्या दैनंदिन आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सामान्य कर्ज योजना उपलब्ध करून देते. शिक्षण, वैद्यकीय खर्च, घरगुती गरज, समारंभ, दुरुस्ती, किरकोळ व्यवसाय किंवा इतर वैयक्तिक कारणांसाठी जलद, सोपे आणि विश्वासार्ह कर्ज मिळविण्याची ही सोय आहे.
व्याज दर - १६%
रक्कम - १००००० ते १००००००
सोन्याचे मूल्य – त्वरित आर्थिक सहाय्य
आर्थिक गरज ओढावल्यावर तुमचे सोनं सुरक्षित ठेवून त्वरित कर्ज मिळविण्यासाठी श्रेयस नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सादर करते नजरगहाण कर्ज योजना. सोपी प्रक्रिया, जलद सेवा आणि सुरक्षित तिजोरी व्यवस्थापन ही या योजनेची खास वैशिष्ट्ये आहेत.
व्याज दर - १६%
रक्कम - १००० ते ३००००००
मालमत्तेच्या सुरक्षिततेवर मोठ्या कर्जाची सोय
आपल्या मालकीच्या स्थावर मालमत्तेवर (घर, फ्लॅट, प्लॉट, जमीन, गाळा इ.) तारण ठेवून मोठ्या रकमेचे कर्ज मिळविण्यासाठी श्रेयस नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत आपल्यासाठी घेऊन आली आहे स्थावरतारण कर्ज योजना. व्यवसाय विस्तार, घर दुरुस्ती/बांधकाम, शिक्षण, वैद्यकीय खर्च, कर्ज एकत्रीकरण किंवा इतर मोठ्या आर्थिक गरजांसाठी ही अत्यंत उपयुक्त योजना आहे.
व्याज दर - १३%
रक्कम - १००० ते ३०००००० (चोख सोन्याच्या ८० टक्के)
तुमची ठेव कायम – गरजेच्या वेळी त्वरित कर्ज
श्रेयस नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत आपल्या सभासदांसाठी सुरक्षित व सोयीस्कर ठेव तारण कर्ज सुविधा उपलब्ध करून देते. आपल्या फिक्स डिपॉझिट / मुदत ठेवीवर तारण ठेवून रक्कम न मोडता त्वरित कर्ज घेण्याची ही उत्तम संधी आहे. यामध्ये ठेवीवरील व्याज सुरूच राहते, तसेच गरजेनुसार कर्ज मिळते.
व्याज दर - १३%
रक्कम - १००० ते ३००००००
सोन्याची सुरक्षितता – आर्थिक गरजेची त्वरित पूर्तता
अचानक आर्थिक गरज भासल्यास तुमचे सोनं विकण्याची गरज नाही!
श्रेयस नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत घेऊन आली आहे सोने तारण कर्ज योजना, ज्याद्वारे आपल्या सोन्याच्या दागिन्यांवर मिळवा जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा.
वाहन आहे तुमचं – आर्थिक पाठबळ आमचं
आपल्या दुचाकी, चारचाकी किंवा व्यावसायिक वाहनावर तारण ठेवून सहज, जलद आणि सुरक्षित कर्ज मिळविण्याची सुविधा श्रेयस नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत आपल्यासाठी उपलब्ध करते. व्यवसाय, वैयक्तिक गरजा, शिक्षण, वैद्यकीय खर्च किंवा इतर आर्थिक आवश्यकतांसाठी ही योजना सर्वाधिक उपयुक्त.