श्रेयस नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत ही संस्था दि. 22 ऑक्टोबर 1981 रोजी स्थापन झाली असून आज ती १०,००० सभासदांचा मजबूत परिवार घेऊन विश्वास, सेवा आणि प्रगतीच्या तत्त्वांवर कार्यरत आहे. संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे ठेवीदारांचे हित जपणे, त्यांच्या रकमेची सुरक्षितता सुनिश्चित करणे तसेच सभासदांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी कार्य करणे. यासाठी संस्था सुरक्षित, विश्वासार्ह व पारदर्शक आर्थिक सेवा प्रदान करण्यास कटिबद्ध आहे.
सभासदांना योग्य मार्गदर्शन, तत्पर व गुणवत्तापूर्ण सेवा, सुरक्षित व्यवहार प्रणाली तसेच सहकार्यपूर्ण वातावरण उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य आहे. उच्च नैतिक मूल्ये, पारदर्शकता आणि नवोन्मेषी उपक्रमांच्या आधारावर संस्था सतत प्रगतीचा ध्यास घेत आहे. भविष्यात अधिक सेवा विस्तार व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहून, मार्च 2026 अखेर 75 कोटी ठेवी संकलित करण्याचे लक्ष्य संस्थेने निश्चित केले आहे.